Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू Death of a leopard

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील आगडी येथील बाबुराव निकोडे यांचे घरा शेजारी असलेल्या विहिरीत पडुन रात्री एक नर बिबट्याचा मृत्यू झाला. वय अंदाजे पाच वर्ष. माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक नायगमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके, क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पडवे,NTCA सदस्य मुकेश भांदककर, संजीवन पर्यावरण  संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार वनरक्षक अनिल नालमवाड हे घटनास्थळी दाखल होऊन मोका पंचनामा केला व मृत बिबट विहरीतुन काढुन शवविच्छेदन करण्यासाठी  TTC चंद्रपूर ला पाठवण्यात आले.

Post a Comment

0 Comments