*शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
आज दि. 26 जानेवारी 2026 रोज सोमवारला शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मा. सौ. सपनाताई मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. राष्ट्राच्या हितासाठी झटलेल्या प्रत्येक महान आत्म्याला वंदन करीत त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थिनींना देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्जनाचे महत्त्व आणि त्यामध्ये स्त्रीची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छ

यानंतर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मा. हर्षा खरासे मॅडम यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर येथील सचिव मा. श्री. राजेश्वर सुरावार सर व कोषाध्यक्ष मा. श्री.अनिल दंडमवार सर यांनी उपस्थिती दर्शवून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. जीवनभाऊ कोंतमवार व मा. सौ. सिंघवीताई यांचीही उपस्थिती लाभली.
याप्रसंगी भारतमाता व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. वैष्णवी चिंतावार यांनी केले.
या कार्यक्रमास समस्त प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments