* समर्थ, रत्नावार, कागदेलवार, फुलझेले, आडपवार यांची सभापती तर कडस्कर यांची उपसभापती म्हणुन अविरोध निवड*
*मूल नगर पालीका सभापतीपदाची निवडणुक*
*मूल (तालुका प्रतिनिधी): 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या मूल नगर पालीकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे 18 उमेदवार निवडुण आले, भाजपाला केवळ 2 जागेवर समाधान मानावे लागले, त्यानंतर कॉंग्रेसकडुन सभापतीपदावर निवड व्हावी यासाठी अनेकजण इच्छुक होते, मात्र मंगळवारी 20 जानेवारी रोजी पिठासीन अधिकारी संदिप दोडे यांच्याकडे सभापतीपदासाठी केवळ 6 उमेदवारीचे अर्ज प्राप्त झाल्याने सर्व सभापतींची अविरोध निवड झाली. यामध्ये प्रशांत समर्थ यांना बांधकाम सभापती तर राकेश रत्नावार यांच्याकडे आरोग्य सभापतीची धुरा देण्यात आलेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन मूल तालुका हा भाजपाचा गड म्हणुन ओळखल्या जाते, माजी मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला म्हणुन ओळख असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल नगर परिषदेत 10 वर्षे मूल नगर पालीकेवर भाजपाची सत्ता होती, त्यानंतर साडेचार वर्षे प्रशासकराज सुरू होता, मात्र निवडणुक आयोगाने राज्यातील नगर पालीकेची निवडणुक 2 डिसेंबर रोजी जाहिर केली, त्यात मूल नगर पालीकेत कॉंग्रेसच्या एकता प्रशांत समर्थ हया नगराध्यक्ष म्हणुन मोठया मताधिक्काने विजयी झाल्या तर 18 नगरसेवक निवडुन आलेत, 22 जानेवारी रोजी सभापतीपदाची निवडणुक घेण्यात आली. यामध्ये बांधकाम सभापती म्हणुन प्रशांत समर्थ, आरोग्य सभापती म्हणुन राकेश रत्नावार, पाणी पुरवठा सभापतीपदी विलास कागदेलवार, महिला व बाल सभापतीपदी नलिनी आडपवार, शिक्षण सभापती ललिता फुलझेले तर उपसभापती समिक्षा कडस्कर यांची अविरोध निवड करण्यात आली. मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी संदिप दोडे यांनी सभापती पदासाठी पिठासीन अधिकारी म्हणुन कामकाज बघितले.
सदर सभापतीची अविरोध निवड झाल्याबद्दल कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदिप कारमवार, कॉंग्रेसचे स्थानिक नेते राजु पाटील मारकवार यांनी अभिनंदन केले.

0 Comments