संजीवन पर्यावरण संस्थेचे सचिव रणदिवे यांना निरोप ; इको पार्क येथे कार्यक्रम संपन्न
संजीवन पर्यावरण संस्थेचे सक्रिय सदस्य तथा सचिव श्री मनोजभाऊ रणदिवे हे मूल महावितरण मधे कणीष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली कल्याण (मुंबई) येथे झालेली असल्याने संजीवन पर्यावरण संस्थे मार्फत दि.७/६/२०२५ ला त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ईको पार्क मूल येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, उपाध्यक्ष प्रशांत मुत्यारपवार, डॉ. संदिप छौनकर, पंकज उजवने, प्रशांत केदार, दिनेश खेवले, विशाल आक्केवार, सुशांत आक्केवार, स्वप्नील आक्केवार, रुपेश खोब्रागडे, अंकुश वाणी, तन्मयसिंह झिरे, संकल्प गणवीर, हर्षल वाकडे, हौशिक मंगर, आदित्य दहीवले, मनिष मोहबंशी, तरुण उपाध्ये, अक्षय दुम्मावार, तन्मय उराडे, हे उपस्थित होते. सर्वांनी मनोज भाऊ रणदिवे यांचे बद्दल आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदैव सर्वांच्या मदतीला धावून जाना-या मनोज भाऊ ला निरोप देतांना संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य भाउक झाले होते.
0 Comments