Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल नगरपालिकेत कुठलीही पदभरती नाही ; अफवांना बळी पडू नये - मुख्याधिकारी दोडे

मूल नगरपालिकेत कुठलीही भरती नाही ; अफवांना बळी पडू नये - मुख्याधिकारी दोडे


मूल नगरपरिषद आस्थापनेवरील कोणत्याही पदाकरिता पदभरती अथवा प्रस्तावित नसून नगरपरिषद मूल पदभरती संदर्भातील कोणत्याही अधिकृत त सोशल मीडियावरील, मोबाईल संदेश, व्हाट्सअप इत्यादी वरील बातमीकडे लक्ष देऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. अधिकृत बातमीकरिता शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा, अशा माहितीची प्रेस नोट मुख्याधीकारी संदीप दोडे यांनी काढली.

विशेष म्हणजे मुल शहरात काही सदर इसम मुल नगरपालिकेत नोकरी लावून देतो म्हणून अनेकांकडून पैसे रोख रक्कम घेत असल्याची अफवा अथवा माहिती आपल्याकडे येत असल्याचे सांगत पदभरती करण्याचे अधिकारही नगरपालिकेला नाही अशीही माहिती मुख्याधिकारी यांनी मूल Live शी बोलताना सांगितले. नगरपालिकेत पैसे घेऊन नोकरी लावून देण्याची चर्चाही मूल शहरात रंगू लागली आहे. त्यामुळे मुल नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी प्रेस नोट काढून नागरिकांना सदर बाबतीत अफवांना बळी न पडण्याचे जाहीर आव्हान केले आहे.

Post a Comment

0 Comments