ट्रक च्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू
मूल - शेतात फवारणीचे औषध खरेदी करून पोंभुर्णा येथून पेंढरी मक्ता कडे दुचाकीने येत असतांना जुनासूर्ला हद्दीत ट्रकने धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक गंभीर जखमी झाल्याने चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सावली तालुक्यातील पेंढरी मक्ता येथील युवक कापसाला फवारणीचे औषध खरेदी करून मोटरसायकलने गोंडपिपरी - खेडी मार्गे येत असतांना पोलीस स्टेशन मुल अंतर्गत जुनासूर्ला हद्दीत ट्रकने उडविले. या अपघातात सारंग गंडाटे ( वय २६) रा. पेंढरी मक्ता याचा जागीच मृत्यू झाला तर प्रियांशु गंडाटे ( वय २३) रा. पेंढरी मक्ता याचा मुल उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. लंकेश समर्थ रा. मुंडाळा हा जखमी असून चंद्रपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
*मूल Live*
एक पाऊल सत्याचे.
कार्यकारी संपादिका
प्रियंका अमित राऊत
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
मो. 9420181841
0 Comments