बेंबाळ येथील घरकुल लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाची रेती वाटप
चांगल्या दर्जाची रेती उपलब्ध करून द्या अन्यथा घरकुल लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा सरपंच यांचा इशारा
मुल:- तालुक्यातील मौजा बेंबाळ येथे रेती व्यवसायीकांकडून घरकुल लाभार्थ्यांची निकृष्ट दर्जाची रेती देऊन फसवणूक करण्यात येत आहे. असा आरोप बेंबाळचे सरपंच चांगले केमेकार यांनी केला आहे. शासनाच्या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप करायची असून सदर गावाला मागील वर्षी दिलेला निकृष्ट दर्जा असलेला रेती घाट यावर्षीही तोच घाट दिलेला आहे. रेती व्यवसायिक चांगल्या दर्जाची रेती चोरीच्या मार्गाने विकत असून निकृष्ट दर्जाची रेती घरकुल लाभार्थ्यांना वाटप करत आहेत. हा सारासार घरकुल लाभार्थ्यांवर अन्याय असून तात्काळ उच्च दर्जाची रेती उपलब्ध करून द्यावी अन्यथा गावातील घरकुल लाभार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा ईशारा बेंबाळ गावचे सरपंच चांगदेव केमेकार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला.

0 Comments