Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रत्येक शहरात असा मार्निंग ग्रुप हवाच! पण तो का? वाचा सविस्तर

प्रत्येक शहरात असा मार्निंग ग्रुप हवाच! पण तो का? वाचा सविस्तर

मूल (अमित राऊत)


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मॉर्निंग ग्रुप Morning Group नावाचा एक समूह आहे. जो रोज मूल  Mul शहरातील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी फिरायला जातो. याच पटांगणावर मूळ शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण-तरुणी, वयस्कर, नागरिक मूल शहरातील सर्व मंडळी येथे फिरायला येतात. मुल शहरातील एक मोठा मैदान म्हणजेच कर्मवीर महाविद्यालयाचे हे पटांगण. याच पटांगणावरून अनेक तरुण-तरुणी धावल्या आणि अनेक ठिकाणी नोकरीही मिळविल्या. Karmvir Ground 

या पटांगणाला लागूनच कॉलेज, कॉन्व्हेंट, रेल्वे, स्थानक झाडे झुडपे आणि निसर्ग रम्य वातावरण आहे. त्यामुळे या पटांगणावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी बघायला मिळते. असं सर्व सुरळीत सुरू असतानाच या शहरावर कुणाची तरी नजर लागली. या पटांगणाला लागूनच रेल्वे रुळावर माल धक्का सुरू होणार होता, त्यासाठी कामाला सुरुवातही नुकतीच झाली होती. ही माहिती मूल शहरातील दिग्गज आणि सकाळी फिरायला जाणारा मॉर्निंग ग्रुप यांना झाली. मालधक्का झाल्याने त्याचे फायदे तोटे काय? याची माहिती मॉर्निंग ग्रुपने घेतली. विशेष म्हणजे यात मोठ्या प्रमाणात तोटाच होणार आणि शहराची नासाडी होणार असल्याचे लक्षात आले. आणि मालधक्का विरोधात सुरू झाला संघर्ष. 

शाळा महाविद्यालय शहरातील नागरिकांपर्यंत जनजागृती चे काम सुरू झाले. मालधक्का मूल शहरात झाल्यास त्याचे किती काय परिणाम होतील याची माहिती नागरिकांना देण्यात आली. आणि मोठा विरोध करत आंदोलनाला सुरुवातही झाली. मूळ शहरात मालधक्का होऊ नये यासाठी जन आंदोलन उभारण्यात आले तीव्र विरोध करण्यात आला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध सुरू झाला. मात्र असे असतानाही काही निम्न लोकांना मात्र मालधक्का झाला पाहिजे याची मोठी आवड तयार झाली होती. मात्र मॉर्निंग ग्रुप चे प्रयत्न आणि जनआंदोलनामुळे माल  धक्क्याला मूल च्या नागरिकांनी मोठा धक्का देऊन परत पाठविले. त्यानंतर मूलवासीयांनी सुटकेचा निस्वास सोडला. त्यानंतर तीन वर्ष उलटला आणि मूळ चंद्रपूर चौपदरीकरण करिता मॉर्निंग ग्रुपने मागणीला सुरुवात केली.

आता मूल-चंद्रपूर मार्ग चौपदरीकरण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. त्यासाठी परिपूर्ण मेहनत घेण्याचे मॉर्निंग ग्रुपने ठरविले आहे. हे सर्व असताना राजकारण येत असले तरी उद्देश मात्र पूर्ण व्हावा हाच एक हेतू घेऊन मॉर्निंग ग्रुप पुढे जात आहे. मूळ शहरावर कोणतेही मोठे संकट आले तर मॉर्निंग ग्रुप स्थानिक राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीय एकत्र येत पुढाकार घेत असल्याने शहरवासीयांच्या मनात आनंद आहे. एकंदरीत संकटाच्या वेळी जो मदत करतो तोच खरा मित्र असतो अगदी त्याप्रमाणेच शहरावर कुठलेही संकट येताना दिसले तर मॉर्निंग ग्रुप पुढाकार घेतो हे मात्र खरे. असा मॉर्निंग ग्रुप प्रत्येक शहरात असायलाच हवा असे सर्वत्र बोलल्या जात आहे......@mit.

Post a Comment

0 Comments