Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी*

*शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहात साजरी*

मूल (२ ऑक्टोबर): शूरवी महिला महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारी प्राचार्या कु. हर्षा खरासे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर गांधीजी व शास्त्रीजी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

मार्गदर्शन करताना प्राचार्या कु. हर्षा खरासे यांनी गांधीजींच्या अहिंसा व सत्याच्या तत्त्वज्ञानाचा तसेच शास्त्रीजींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषवाक्याचा उल्लेख करून त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.


हा कार्यक्रम श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. कापर्ती सर व सचिव श्री. सुरावार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मूल Live 
एक पाऊल सत्याचे 
कार्यकारी संपादिका 
प्रियांका अमित राऊत 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 
मो.9420181841.9834601575


Post a Comment

0 Comments