Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अखिल कुणबी महासंघ मूल तालुका युवती अध्यक्षपदी कुमुदिनी भोयर यांची नियुक्ती

अखिल कुणबी महासंघ मूल तालुका युवती अध्यक्षपदी कुमुदिनी भोयर यांची नियुक्ती


मूल — अखिल कुणबी महासंघाच्या मूल तालुका युवती अध्यक्षपदी कुमुदिनी भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती अखिल कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरेकर यांच्या हस्ते करण्यात आली असून, त्यांच्या निवडीने तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
कुमुदिनी भोयर या मूल शहरातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. सध्या त्या प्रेस क्लब मूलच्या सचिव म्हणून जबाबदारी पार पाडत असून, पत्रकारितेतून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य त्या सातत्याने करीत आहेत. निर्भीड लेखन, सामाजिक जाणिवा आणि महिलांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशील भूमिका यामुळे त्यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 



अखिल कुणबी महासंघाच्या माध्यमातून युवतींचे संघटन, समाजप्रबोधन, शैक्षणिक प्रोत्साहन, तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रभावी कार्य करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली मूल तालुक्यातील कुणबी समाजातील युवतींसाठी नवे संधीचे दालन खुले होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता व महिला संघटनांकडून कुमुदिनी भोयर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments