भाजीपाला उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी केले 6 ठिकाणी पाईप लाईन गळती
नगरपालीकेला लाखो रूपयाचा भुर्दंड : नगराध्यक्ष एक्शन मोडवर
मूल (प्रतिनिधी) : शहरवासीयांना पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनमध्ये जवळपास 11 ठिकाणी गळती असल्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास उशिर होत असल्याने मूलच्या नगराध्यक्षा एकता समर्थ यांच्या नेतृत्वात बोरचांदली ते हरणघाट पर्यंतच्या पाईपलाईनची तपासणी केली असता 6 शेतकऱ्यांनी पाईपलाईन गळती करून भाजीपाला लागवड करीत असल्याची बाब उजेडात आली. नव्यानेच पदभार घेतलेल्या नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी शहरवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी एक्शन मोडवर आल्याने त्यांच्याप्रती शहरवासीयांनी समाधान व्यक्त करीत आहे.
मूल शहरातील नागरीकांना शुध्द आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी हरणघाट नदीघाटावरून मूल येथील वेगवेगळया पाणी टाकीमध्ये पाणी भरल्या जातो, मागील काही दिवसापासून पाणी टाकी भरण्यासाठी उशीर होत असल्याने मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वात माजी बांधकाम सभापती तथा विद्यमान नगरसेवक प्रशांत समर्थ, पाणी पुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता रामटेके आणि नगर पालीकेचे अधिक्षक विनोद येनुरकर यांनी बोरचांदली पासुन तर हरणघाट नदीपर्यंतची पाईप लाईन गुरुवारी दुपारपासून तपासणी केली, दरम्यान 11 ठिकाणी पाईप लाईन गळती असल्याने दिसुन आले. यापैकी 6 ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईप लाईन गळती करून शेतातील पिकांना पाणी पुरवठा करीत असल्याचे दिसुन आले.
शहरातील नागरीकाना पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने सदर पाईप लाईन गळती दुरूस्तीचे काम नगर पालिकेकडून टप्याटप्याने करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी यावेळी सांगीतले. दरम्यान एका आठवडयात एक पाईप लाईन गळती दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे मूल शहरातील नागरीकांनी सहकार्य करण्याची विनंती नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी केले आहे.

0 Comments