शूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
आज दिनांक 12 जानेवारी 2026 रोज सोमवारला *शूरवी महिला महाविद्यालय, मुल* येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
"राजा होणारा व्यक्ती हा अन्याय सहन करत नाही तर तो ते नष्ट करतो, हे कार्य जर जनतेसाठी आहे तेव्हा देव तुझ्या पाठीशी आहे" असा आत्मविश्वास शिवाजी महाराजांमध्ये रुजविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ तसेच "उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका" असा संदेश देणारे स्वामी विवेकानंद
यांच्या जन्मदिनानिमित्त प्रा. डॉ. मीनाक्षी राईंचवार यांनी दीपप्रज्वलन करून त्यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

0 Comments