Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मुल येथे भाऊंचा गरबा - दांडिया महोत्सव - 2025 चे भव्य आयोजन

मुल येथे भाऊंचा गरबा - दांडिया महोत्सव - 2025 चे भव्य आयोजन    

स्पर्धेचे मुख्य आकर्षण सिनेतारका  प्राजक्ता माळी यांची 01ऑक्टोबरला  उपस्थिती 

मुल :-

मुल येथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार, माजी वने सांस्कृतिक वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात भाऊंचा गरबा 2025 ला नवरात्री उत्सवानिमित्य स्व.चांगुनादेवी सच्चिदानंद मुनगंटीवार सेवा समिती मुल  यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल मूल येथे भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा गरबा महोत्सव दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान सुरू राहणार आहे. या महोत्सवात भव्य समूह गरबा दांडिया स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण सिनेतारका व लावण्य सम्राज्ञी प्राजक्ता माळी राहणार या आहेत. त्या दिनांक 01  ऑक्टोबरला संध्याकाळी 05 वाजेपासून ते  रात्री 10 वाजेपर्यंत उपस्थित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार  आहेत.                                या गरबा महोत्सवात  मोठ्या प्रमाणात स्पर्धक  उत्स्फूर्त सहभाग घेत आहेत. विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्रीची प्राजक्ता माळी या गरबा सोहळ्यात  01 तारीख ला उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार असून नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रंगीबेरंगी लाईट्स, आकर्षक बक्षीस, उत्कृष्ट सजावट व पारंपरिक तालावर होणारा गरबा यामुळे संपूर्ण मुल परिसर सणाच्या जल्लोषात न्हाऊन निघणार आहे.
   दिनांक 29 सप्टेंबरला मुल तालुका व मूल शहरासाठी सायंकाळी 6:00 वाजेपासून समूह गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 15000 रुपये माजी चंद्रपूर  जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस  11000 रुपये भाजपाचे माजी मुल शहराध्यक्ष प्रभाकर भोयर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस 5000 रुपये नगरपरिषद मूल चे माजी नगरसेवक चंद्रकांत आष्टनकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे.



      दिनांक 01 ऑक्टोबरला खुली समूह गरबा दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 51000 रुपये आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस 31000 रुपये ग्रामपंचायत भेजगाव चे माजी सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस 21000 रुपये नगरपरिषद मूलचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच बेस्ट गरबा कपल म्हणून 7000 रुपयाचे बक्षीस भाजयुमो चे मुल शहराध्यक्ष  राकेश ठाकरे यांच्याकडून  देण्यात  येणार आहे. बेस्ट गरबा क्वीन म्हणून 5000 रुपयाचे बक्षीस  बक्षीस भाजपा नेते व कार्यकर्ते सुधीर भोयर यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच दररोज होणाऱ्या सोलो गरबा स्पर्धेत 2000 रुपयाचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. प्रोत्साहन पर 04 बक्षिसे देण्यात येणार आहेत  तसेच दररोज 10  प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ द्वारे आकर्षक भेटवस्तू आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. तरी या भव्य समूह गरबा दांडिया स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसांची लयलूट करावी असे आवाहन भाऊंचा गरबा महोत्सव - 2025 समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments