राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा सचिवपदी धारा मेश्राम यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडीच्या कार्यकर्त्यां धारा मेश्राम यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सचिव पदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजना पारशीवे यांनी नियुक्ती केली आहे.
धारा मेश्राम या अगोदर मुल शहर च्या महिला अध्यक्ष म्हणून कार्य केल्या असून या पदावर राहून त्यांनी महिलांचे संघटन करून राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुती देण्याचे कार्य केले आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या सतत आग्रही असतात.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रंजना पारशीवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, शहर अध्यक्ष आकाश येसनकर,संगीताताई गेडाम यांना दिले असून त्याच्या नियुक्ती बद्दल कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करून त्याचे अभिनंदन केले.
*मूल Live*
*एक पाऊल सत्याचे*
कार्यकारी संपादिका
प्रियंका अमित राऊत
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
Mo.9420181841

0 Comments