आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या टपाल तिकीट प्रकाशनाचा मार्ग मोकळा
माजी सांस्कृतिक कार्यमंत्री आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना विद्यमान मंत्री आशिष शेलार यांचा सकारात्मक प्रतिसाद
सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी त्वरित कार्यवाहीचे दिले आश्वासन
मुंबई - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र व आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व करणारे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचे निवेदन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार यांच्याकडे सादर केले. या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेत मंत्री महोदयांनी त्वरित कार्यवाहीचे आश्वासन दिले.
हा निर्णय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपुत्र, विधीक्षेत्रातील विद्वान आणि आंबेडकरी चळवळीचे प्रभावी नेतृत्व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला व समतेच्या मूल्यांना एक सन्मानपूर्वक अभिवादन आहे, अशी भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल मल्टीपरपज सोसायटी, चंद्रपूरचे सचिव श्री. प्रतीक डोर्लीकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल तिकीट प्रकाशनासंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विनंती केली होती.आ. मुनगंटीवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर सकारात्मकता दर्शवत सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल तिकीट प्रकाशित होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. “या प्रकाशनाद्वारे त्यांच्या समतेच्या लढ्याला आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या अविरत व्रताला एक नम्र अभिवादन अर्पण केले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*मूल Live * *एक पाऊल सत्याचा*
0 Comments