Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुनील गेडामची हत्या का केली? आरोपीने सांगितले कारण!

सुनील गेडामची हत्या का केली?  आरोपीने सांगितले कारण!

   मूल : मुल एमआयडीसी - टेकाडी मार्गांवर सेवानिवृत्त केंद्र प्रमुखाची मृतदेह आढळला. घातपाताची शक्यता असल्याचे मुल पोलिसांच्या तपासात आढळून आल्याने संशयित इसमला ताब्यात घेऊन झडती घेतली असता हत्या केल्याची कबुली किस्मत मोहमद अली सय्यद यांनी दिली असून आणखी आरोपी आहेत का याबाबत पुढील तपास केल्या जात आहे.

      टेकाडी येथील रहीवाशी तथा सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनिल कालीदास गेडाम (६०) असे मृतकाचे नांव आहे. टेकाडी येथील आरोपी किस्मत मोहम्मद अल्ली सय्यद (२४) व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुनिल कालीदास गेडाम हे सावली मार्गावरील रानसंपन्न हॉटेलमध्ये जेवन करण्यासाठी शुक्रवारी रात्रौ ७ वाजता दरम्यान गेले होते. जेवन करून मूलला परत येतांना आरोपी किस्मत अली ह्याने महत्वाचे काम आहे. असे सांगुन टेकाडीला घेवुन गेला. राजौ ८.३० वा. चे दरम्यान टेकाडी वरून एमआयडीसी मधील मार्गाने मूल कडे येत असतांना किस्मत सय्यद यांनी उसनवार घेतलेली रक्कम देण्यास नकार देत असल्याचे कारणावरून काही मिञांच्या मदतीने सुनिल गेडाम यांचे डोक्यावार लोखंडी सळाखीने वार करून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मरेगांव-टेकाडी मार्गावरील नाल्यात मृतदेह फेकुन दिले.





       दरम्यान सुनिल गेडाम हे उशीर होवुनही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. गेडाम याला घरून बोलावुन नेणा-या किस्मत अली याचेविषयी शंका आल्याने मुलगा पंकज गेडाम ह्याने पोलीस स्टेशन मूल येथे हरविले असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान आकापूर जवळील वळण मार्गावर सुनिल गेडाम यांची पल्सर दुचाकी (NH34-AX-8323) मोबाईल, चष्मा आणि चप्पल दिसत असल्याची माहीती पोलीसांना मिळाली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी संशयीत म्हणुन किस्मत मोहम्मद सय्यद अली ह्याला ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी उसनवार घेतलेले सहा लाख रूपये देण्यास नकार दिल्याने जीवे मारल्याचे मान्य करून प्रेत लपविल्याचे ठिकाणही पोलीसांना सांगीतले. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळ गाठुन फॉरेन्सीक टिमच्या सहकार्याने प्रारंभीक चौकशी करून मृतदेह उपजिल्हा रूग्णालय मूल येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.

पोलीस स्टेशन मूल येथे आरोपी किस्मत अली विरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहे. घटनेतील आरोपी ह्याचा गुरे खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने सदर प्रकरणात पुन्हा काही जणांचा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहे. 
 

मूल Live
एक पाऊल सत्याचे 
प्रियंका अमित राऊत 
कार्यकारी संपादक

Post a Comment

0 Comments