Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

*घर आणि नळाचे कर भरूनही कोरकु वस्ती अजुनही समस्याग्रस्त*

घर आणि नळाचे कर भरूनही कोरकु वस्ती अजुनही समस्याग्रस्त
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे दिले निवेदन : युवाक्रांती संघटना घेतली पुढाकार

मूल (तालुका प्रतिनिधी): गेल्या 25 वर्षापासुन रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून वस्ती केलेल्या काही कोरकु कुटुंबियांना नगर पालीकेच्या दुर्लक्षामुळे रस्ते नाली व इतर सुविधेपासुन वंचित राहावे लागत आहे. मुलभुत समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी कोरकु कुटुंबियांनी युवाक्रांती संघटनेच्या पुढाकारातुन राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.



मूल येथील वार्ड क्रं. 14 मध्ये गेल्या 25 वर्षापासुन कोरकु गोंड समाजाचे शेकडो नागरीकांनी रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करून राहात आहेत. मिळेल ते मोलमजुरी करून कुटुंबाचे उदनिर्वाह करीत आहे. यावस्तीमध्ये अजुनही नाली, मजबुत रस्ता बनविण्यात आलेले नाही, जागेअभावी त्यांनी घरकुल योजनेचा लाभ सुध्दा मिळत नसल्याने अतिक्रमण करून केलेल्या जागेवर राहात आहेत. यामुळे प्रशासनाने जमिनीचे पट्टे देवुन घरकुल बांधुन देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे.
 अतिक्रमण करून राहात असलेल्या घरावर नगर पालीकेने कर आकारलेला आहे. नळाचे कर सुध्दा नगर पालीका वसुली करीत आहे मात्र मुलभुत समस्या अजुनही कायम आहे. यामुळे डेंगू, मलेरिया, टायफाईड, वारंवार ताप येणे यासारख्या समस्येला त्यांना तोंड दयावे लागत आहे. यामुळे सांडपाणी जाण्यासाठी नाली बांधण्यात यावे व राहण्याकरीता जमिन व घरकुल मिळावे यासाठी येथील नागरीकांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केलेले आहे. दरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे युवाक्रांती संघटनेच्या पुढाकारातुन येथील नागरीकांनी निवेदन देवुन नाली, रस्ता आणि घरकुलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केलेली आहे

*मूल live*
एक पाऊल सत्याचे 
कार्यकारी संपादिका
प्रियंका अमित राऊत

Post a Comment

0 Comments