18 वर्षांनी वर्गमित्र एकत्र ; शाळेतील आठवणींना दिला उजाळा
मूल (अमित राऊत)
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मुल शाळेचे तब्बल 18 वर्षानंतर सन 2006 - 2007 ची बॅच चा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा व शिक्षक सन्मान कार्यक्रम स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूल च्या शाळेत झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक संतोष खोब्रागडे, उद्घाटक माजी मुख्याध्यापक दामोधर गायकवाड, प्रमुख पाहुणे शिक्षक धनंजय गुरूनुले, मिलींद भेंडारे, चंदू शेंडे, सुषमा नागोसे, साधना चिताडे, सत्यशाही वलके, आकाश संगेल, रूपचंद उराडे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
सुरुवातीला सरस्वती मातेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उपस्थित पाहुण्यांचे माजी विद्यार्थीनी शिवानी चिंतावार, रुणाली चावके यांनी स्वागतगीताने स्वागत केले. यावेळी शिक्षणाचे धडे देत पुढे जाण्याचा मार्ग दाखविणाऱ्या सर्व शिक्षकांचा शाल आणि गुलाबाचे फुल देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षकांनी मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले. यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली.
आपले पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवत 18 वर्षांनी सर्व माजी विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे संचालन अमित राऊत यांनी केले. तर आभार ऋणाली चावके यांनी मानले. यावेळी 2006 - 2007 च्या बॅच मधील वर्गमित्र असलेले मात्र हयात नसलेले मित्र गुरुदास चिताडे, विक्रांत आदे, नाझिया शेख आणि हयात नसलेले शिक्षक गाजेवार यांना आठवण करीत मौन पाळण्यात आला. 2006 — 2007 बॅच च्या दहाव्या वर्गातील गेट-टुगेदर या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता मंगेश भालेराव, आशिक महिलावार, अतुल कांमडे,स्वप्निल कामडे आदी माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
0 Comments