सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
मूल प्रतिनिधी
विविध शालेय उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारी सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने इयत्ता १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे इयत्ता ८ वा वर्ग शिकलेले व या वर्षी इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. महेश पानसे, नगर परिषद मूल चे माजी सभापती प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नंदाराम , संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप,माजी नगराध्यक्ष उषाताई शेंडे, ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले, ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष सुवर्णाताई पिपरे, पालक शिक्षक समितीच्या उपाध्यक्ष इंदूताई मडावी, समितीच्या सदस्या उषाताई थोरात, शाळेचे पदवीधर शिक्षक राजू गेडाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्याची वाटचाल करताना कोणत्या गोष्टी आत्मसात कराव्यात ? यावर मार्गदर्शन करुन इयत्ता १२ वी नंतर विविध अभ्यासक्रम असुन दुसऱ्याचे अनुकरण न करता आपल्याला काय झेपेल यावरच विचार मंथन करून मार्ग निवडण्याचे आवाहन यावेळी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने अभ्यासापयोगी भेट वस्तू पुष्य गुच्छ व पेढा भरवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रीना मसराम, प्रस्ताविक सहाय्यक शिक्षक बंडू अल्लीवर तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षक अजय राऊत यांनी मानले. अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments