Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजभूषण पुरस्काराचे वितरण

अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त समाजभूषण पुरस्काराचे वितरण


मुल : धनगर/कुरमार समाज जुनासुर्ला तर्फे दिनांक ३१ मे रोजी जुनासुर्ला येथे पुण्यश्लोक, राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दीय जयंती निम्मित सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गंगाधर धुळेवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुखरुजी कोमावार होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील आशाताई देशमुख, माणिक पाटेवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. धनगर समाज जुनासुर्ला तर्फे गेल्या दोन वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व *नवनियुक्त इन्कम टॅक्स असिस्टन्स पदावर निवड झाल्याबद्दल सुनील पाटेवार, महाराष्ट्र पोलिस पदी निवड झालेले मारोती कंकलवार, बांधकाम विभागात नियुक्त झाल्याबद्दल योगेश इनमुलवार तर आरोग्य विभागात मयुरी कोमावार यांची नियुक्ती झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.* अतिशय कठोर परिश्रमातून पुढे गेलेल्या या युवकांनी जुनासुर्ला गावाचे नाव उंचावले असून यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 

तसेच नुकताच काही दिवसांपूर्वी दहावी / बारावीच्या निकाल जाहीर करण्यात आला. यात धनगर/कुरमार समाजातून उत्कृष्ट गुण प्राप्त विद्यार्थी समीर रामलवार,  साहिल येग्गेवार, नियती धुळेवार, गायत्री अन्नावार, लोकेश ईदुलवार यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात धनगर/कुरमार समाजाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन किशोर सुरेवार यांनी केले तर गौरव रामेवार यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments