कृषी महाविद्यालय मूल येथे स्नेहसंमेलनाचे आयोजन
Organized social gathering at Agricultural College Mulडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय मूल चे वतीने स्थानिक कन्नमवार सभागृह मूल येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक ३ व ४ मार्च रोजी करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. शामसुंदर माने ,पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे भुषविणार असून कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई फडणवीस ,माजी मंत्री महाराष्ट्र राज्य ह्या असणार आहेत.
दोन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, उद्घाटन सोहळा, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व समारोप असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सहयोगी प्राचार्य डॉ विष्णुकांत टेकाळे असणार आहेत.
अशा या सांस्कृतीक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना प्रदर्शित करण्याचे आवाहन महाविद्यालयातील प्राध्यापक व्रुंद ,विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले आहे. तर निमंत्रीतांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. टेकाळे यांनी केले आहे.

0 Comments