मूल तालुक्यातील कर्मचारी संपांवर,विद्यार्थी,नागरीकांना बसणार फटका
Students, citizens will be affected due to employee strikes in Mula talukaजुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीला घेऊन आज राज्यभरात जवळपास १८ लाख कर्मचारी बेमुदत संपावर गेली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात सुद्धा या बेमुदत संपला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शाळा, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग,वनपिभाग, तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती अंतर्गत असलेल्या विविध विभागात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत असल्याने कामकाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे.
आज सकाळपासूनच विविध विभागातील कर्मचारी पंचायत समिती तहसील कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय समोर बसून घोषणा देत शासनाच्या प्रति रोष व्यक्त करत आहेत. कर्मचारी आपल्या मागणीला घेऊन ठाम असल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


0 Comments