Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुभाष उच्च प्राथमिक शाळेत महिला दिन उत्साहात

सुभाष उच्च प्राथमिक शाळेत महिला दिन उत्साहात 


विद्या प्रसारण मंडळ मुल द्वारा संचालित सुभाष  उच्च प्राथमिक शाळा मुल येथे  आज दिनांक 8 मार्च 2025 रोज शनिवारला 
जागतिक महिला दिनाच  कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ सुवर्णाताई पीपरे ,तसेच प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष 
इंदू ताई  मडावी तसेच माता पालक समितीचे उपाध्यक्ष श्रीमती उषाताई थोराक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका कु.रीना मसराम ,सौ.निशा जगताप उपस्थित होत्या तसेच विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून सौ . मेघा भट यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींनी महिला बद्दल होणारे अन्यायकारक वृती यावर नाट्यछटा , स्त्रीभ्रूण हत्या या ज्वलंत विषयावर नृत्य सादरीकरण करण्यात आले.  तसेच विद्यार्थिनींनी विविध थोर महीलाची वेशभूषा करून उत्कृष्ट सादरीकरण केले.तसेच सोनाली घोगरे या मुलींनी स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर प्रकाश टाकला. कार्यक्रम प्रसंगी ज्या विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला त्या सर्वांना तसेच प्रामाणिकपणे, शांत  सुस्वभावी 
 मनमिळाऊ स्वभावाचे धनी स्वयंपाकी मदतनीस यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश जगताप याच्याकडून आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला..या प्रसंगी 
 मोठ्या संख्येनी मातापालक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कू. आर्या कमलापुरवार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कू.समीक्षा शेंडे व आभार कू.अवणी लेनगुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री राजू गेडाम शाळेचे सहाय्यक शिक्षक राहुल मुंगमोडे  श्री योगेश पुलकवार श्री अजय राऊत श्री बंडू अलि वार व श्री संकेत जाधव आभारे मॅडम, यांनी अथक परिश्रम घेतले आणि खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Post a Comment

0 Comments