Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत ‘‘जिवंत सातबारा" मोहिम’

100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत ‘‘जिवंत सातबारा" मोहिम’

मूल प्रतिनिधी 


100 दिवस कृती आराखडा अंतर्गत दिनांक 01 एप्रिल 2025 पासुन ‘‘जिवंत सातबारा मोहिम’’ अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांनी नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टीकोनातुन संपूर्ण राज्यात ‘‘जिवंत सातबारा मोहिम’’ राबविण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यांत आला आहे. 
                                                             
त्या अनुषंगाने मुल तालुक्यात सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करुन मयत खातेदारांच्या वारसाची नोंदीचे कामकाज पूर्ण करण्याच्या दृष्टीने ‘‘जिवंत सातबारा मोहिम’’ राबविण्यांत येत आहे. सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया करणेसाठी आवश्यक असलेल्या सर्व नोंदी घेवून सातबारा ‘‘जिवंत’’ म्हणजेच अद्ययावत करणेसाठी मोहिम राबविण्यांत येत असुन मोहिम राबविण्यासाठी खालील प्रमाणे कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यांत येत आहे. 
1. दि. 01.04.2025 ते 5.04.2025 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी त्यांच्या साजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करुन न्यायप्रविष्ठ प्रकरणे सोडून गाव निहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे.
2. दि. 06.04.2025 ते 20.04.2025 वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे (मृत्युदाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख /स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील / सरपंच /ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांचे नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवास बाबतचा पुरावा ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करणे व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी स्थानिक चौकशी करुन मंडळ अधिकारी यांचे मार्फत वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणे.
3. दि. 21.04.2025 ते 10.04.2025 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा. त्यानंतर म.ज.म.अ. 1966 च्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार वर निर्णय घेवून त्यानुसार 7/12 दुरूस्ती करावा जेणेकरुन सर्व जिवंत व्यक्ती 7/12 वर नोंदविलेल्या असतील.
                          
वरीलप्रमाणे ‘‘जिवंत सातबारा मोहिम’’ राबविणयात येत असून शहरी महानगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी, नगरपरीषद मुल व ग्रामीण भागात गट विकास अधिकरी, पंचायत समिती मुल याच्यामार्फतीने सर्व गावागावामध्ये दंवडी देण्यासबंधाने संबधित गावाचे सरंपच, ग्रामपचांयत सदस्य, पोलीस पाटील, रेशन दुकानदार व त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती याचे माध्यमातुन व लॉउडस्पीकरव्दारे सदर मोहिमेबाबत दंवडीव्दारे प्रचार व प्रसिध्दी देण्यात आलेली आहे.
                       
सदर कालबध्द कार्यक्रम विहित मुदतीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असुन सदर मोहिम यशस्वी करण्याकरीता गावातील प्रत्येक गावकरी व नागरीकांना आवाहन करण्यात येते आहे की दिनांक 20.04.2025 पर्यत आपल्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे आपल्या गावातील संबधीत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) याच्याकडे सादर करावे.

Post a Comment

0 Comments