Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

उपजिल्हा रुग्णालय मुल येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन


मुल :-भारताचे पंतप्रधान राष्ट्र गौरव, विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्य उपजिल्हा रुग्णालय मुल येथे दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी 11:30 वाजता स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाची सुरुवात करण्यात आली. हे अभियान दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
 या अभियानाचे उद्घाटन जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर देवेंद्र लाडे जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर देवेंद्र लाडे, नगरपरिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भारतीय जनता पार्टीचे माजी मुल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नगरसेवक व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य चंद्रकांत आष्टणकर, भाजपा नेते प्रशांत बोबाटे, भाजपा ओबीसी मोर्चा मूल शहर अध्यक्ष युवराज चावरे,भाजपा युवा मोर्चा मुल शहराचे माजी अध्यक्ष राकेश ठाकरे, भाजपा ओबीसी मोर्चा मुल शहराचे उपाध्यक्ष सोमनाथ झरकर, भाजपा युवा नेते सुधीर भोयर,भाजपा युवा मोर्चा मूल शहराचे उपाध्यक्ष वंश बोबाटे उपाध्यक्ष सूरज मांदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानात राष्ट्रातील महिलाचे महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे या दृष्टिकोनातून बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर आरोग्य तपासणी, उपचार सेवा, पोषण यावर विशेष भर देण्यात आलेला आहे.
    स्वस्थ भारत, सशक्त परिवार या अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय मुल येथे दिनांक 23 सप्टेंबरला भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आरोग्य शिबिराचा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर देवेंद्र लाडे यांनी केलेले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments