Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

वेटलिफ्टिंग विभागीय स्पर्धेत तेजस्विनी चौखुंडे प्रथम

 

नवभारत विद्यालय मुल ची तेजस्विनी चौखुंडे राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचं नेतृत्व करणार

 वेटलिफ्टिंग विभागीय स्पर्धेत तेजस्विनी चौखुंडे प्रथम 

मूल: वर्धा जिल्हा क्रीडा स्टेडियम येथे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत नवभारत विद्यालय, मूल येथील विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी नरेश चौखुंडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत 53 किलो गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.


या यशामुळे तेजस्विनी ची निवड येत्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली असून, ही स्पर्धा नाशिक येथे होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तेजस्विनी नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.




तेजस्विनी च्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे सर आणि शारीरिक शिक्षक गुरुदास चौधरी तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments