ॲड. वासाडे हे मागील काही महिन्यापासून आजारी होते. आज त्यांचे निधनाची वार्ता कळताच अनेकांनी शोक व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे ते माजी अध्यक्ष होते. बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरग कॉलेजची निर्मिती ॲड. वासाडे यांनी केली. कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, येनबोडी या संस्थांचे ते माजी अध्यक्ष होते.
ॲड. बाबासाहेब वासाडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जात होते. अखेरपर्यंत ते खासदार शरदचंद्र पवार यांच्या सोबतच राहिले.
१० वाजता त्यांच्या राहत्या घरून शांतीधामकडे निघणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांसाठी सतत झटणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आता आपल्या सोबत नसल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. यासोबतच खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी गृह राज्यमंत्री, हंसराज अहिर, माजी खासदार नरेश बाबू पुगलिया, आ. सुधिर भाऊ मुनगंटीवार, आ. देवराव भोंगळे, आ. विजय भाऊ वडेट्टीवार, आ. करण दैवतळे, शिक्षण प्रसारक मंडळ मूळचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे यांच्यासह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्याAahatचंद्रपूर जिल्ह्याची ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी, शिक्षण महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे (८१) यांचे आज दुपारी ४ वाजता चे दरम्यान दीर्घ आजाराने चंद्रपूर येथे दुःखद निधन झाले. उद्या (दिनांक २० सप्टेंबर) चंद्रपूर येथील शांती धाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
ॲड. वासाडे हे मागील काही महिन्यापासून आजारी होते. आज त्यांचे निधनाची वार्ता कळताच अनेकांनी शोक व्यक्त केले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे ते माजी अध्यक्ष होते. बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरग कॉलेजची निर्मिती ॲड. वासाडे यांनी केली. कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, येनबोडी या संस्थांचे ते माजी अध्यक्ष होते.
ॲड. बाबासाहेब वासाडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू समजले जात होते. अखेरपर्यंत ते खासदार शरदचंद्र पवार यांच्या सोबतच राहिले.
१० वाजता त्यांच्या राहत्या घरून शांतीधामकडे निघणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांसाठी सतत झटणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आता आपल्या सोबत नसल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. यासोबतच खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी गृह राज्यमंत्री, हंसराज अहिर, माजी खासदार नरेश बाबू पुगलिया, आ. सुधिर भाऊ मुनगंटीवार, आ. देवराव भोंगळे, आ. विजय भाऊ वडेट्टीवार, आ. करण दैवतळे, शिक्षण प्रसारक मंडळ मूळचे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे यांच्यासह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
0 Comments