गोरगरिबांच्या उन्नतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची संकल्पबद्धता प्रेरणादायी – आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार
प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारत विश्वपटलावर अग्रस्थानी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा ग्रामीणकडून सेवा पंधरवड्याचा भव्य प्रारंभ
शिबिरात 220 रक्तदात्यांचा उत्साहपूर्वक रक्तदान
चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या 27 मंडळांत स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ भारत अभियानाला चालना
चंद्रपूर, दि. 18 : देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या अद्वितीय नेतृत्वामुळे भारताने आज जागतिक पातळीवर अभूतपूर्व प्रगती साधली आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक अशा सर्वच क्षेत्रांत नवे शिखर गाठत भारताने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. गोरगरीब, शोषित, वंचित व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी घेतलेली संकल्पबद्धता आणि अखंडित जनसेवा हीच प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान ठरत असून, त्यांच्या कार्यपद्धतीतून जनसेवेला नवे अधिष्ठान लाभले आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.
कामगार मनोरंजन सभागृह, ऊर्जानगर येथे चंद्रपूर तालुक्यातील भाजपा मंडळ कार्यकारिणीच्या सदस्यांसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण हरिश शर्मा, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री रामपालसिंह, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौतम निमगडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्षाने सेवा पंधरवड्याचा भव्य प्रारंभ केला. रक्तदान, स्वच्छता व सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या सेवाभावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत समाजकार्याचा नवा आदर्श घालून दिला. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापूर,ऊर्जानगर मंडलात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 220 रक्तदात्यांनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदवत रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. हे रक्तदान म्हणजे फक्त रक्ताचा थेंब नव्हे, तर देशहितासाठी अर्पण केलेली निष्ठा आहे.
पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पना व मार्गदर्शनातून प्रेरित होऊन, चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या सर्व 27 मंडळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाला चालना देत कार्यकर्त्यांनी गावागावांत स्वच्छतेचा संदेश पोहोचवला. मा. मोदीजींनी दिलेला "सेवा हीच सर्वोच्च साधना" हा संदेश या उपक्रमातून प्रत्यक्ष साकार झाला.
रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका अध्यक्ष श्रीनिवास जंगम, हनुमान काकडे, विलास टेंभुर्णे, नामदेवराव आसुटकर, शांताराम चौखे, संजय यादव, अमोल जगताप, देवानंद थोरात, सुनील बरीयेकर, फारुख शेख, अशोक आलम, अनिता भोयर, श्रीमती रोशनी खान, नागेश कडुकर, चंद्रकांत ढोडरे, वासुदेव गावंडे, लक्ष्मीताई सागर, केमा रायपुरे, इम्रान पठाण, मनोज मानकर, भारत रायपुरे, मदन चिवडे, हरीश व्यवहारे, भारत काटवले, रंजना किनाके, वनिता आसुटकर, सुरेखा थोरात, मुक्ताताई येरगुडे, भोजराज शिंदे, माला ताई रामटेके, अरविंद बोरकर, प्रवीण चोपकर, मोनिष अस्वानी, अतुल पिल्लरवार, प्रज्योत पुणेकर, नंदू इंगळे, नंदू पटले, विजय झाडे, प्रभाकर ताजणे, जयंत टापरे, जावेद पठाण, गोणी जसपाल, किशोर मांडवकर, गीता वैद्य, जितेंद्र अलेकर, सम्यक कातकर, अर्चित राऊत, गटारी लोणबले, दीपक मडावी, मनीषा थेरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
या सेवा उपक्रमांमुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा नवा आदर्श उभा राहिला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली आहे.
0 Comments