मुख्याधिकारी संदीप दोडे यांच्या प्रशासकीय कार्यवाहीला यश ; लाड पागे समितीची अंमलबजावणी - सफाई कामगारांना मिळाले न्याय
मूल प्रतिनिधी
नगरपरिषद मुल येथील मुख्याधिकारी ,श्री संदिप जी रोड़े यांची प्रशासकीय कार्यवाही ला यश,लाड पागे समितीच्या अंमलबजावणी संदर्भात सफाई कामगारांचे वारसदारांना मिळाले न्याय ,,, अखिल भारतीय सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.छगन महातो ,यानी नगरपरिषद मुल येथील दिवंगत सफाई कामगारांचे वारसदारांना लाड़ पागे समितीच्या शिफारशी प्रमाणे सेवेत सामावून घेण्यास शासनाला पाठपुरावा करून केलेली मागणी ला मुख्याधिकारी,संदिप जी रोड़े यांनी यशस्वी करून.अर्जदार बाळु भीमराव वाळके , आकाश विश्वनाथ मोटघरे,सदिप घनश्याम वाळके ,सुयेश कवडु निमगडे, यांना नियुक्ती दिली, तसेच रोजंदारी तत्त्वावर कायम झालेले सफाई कामगारांचे वारसदारांना नौकरीत सामावून घेण्यास आज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव ,छगन जी महातो यांच्या सोबत एक तास सकारात्मक चर्चा करून पात्र वारसदारांना पण नियुक्ती मिळणार याची हमी दिली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफलय योजना, संदर्भात चर्चा केली व ज्यांची सेवा पंचवीस वर्षे झाली आहे अशा सफाई कामगारांचे प्रस्ताव त्वरित मंजुरी साठी पाठवला असे सांगितले , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे उपदान त्वरित देण्यात यावे ,व मुल नगर परिषद मध्ये सफाईचे नविन कंत्राट झाल्यानंतर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्यांच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णया नुसार, आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर श्री. विपीन पालीवाल साहेब यांच्या दि. ६/१०/२०२५ च्या मिनिट्स नुसार कंत्राट मध्ये सुधारणा करून स्थानिक मेहतर, भंगी, डुमार, मखियार, सर्व प्रथम या प्रवर्गांना प्राधान्य देण्यात यावे असे अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली संघटनेच्या वतीने कामगार हितैषी, श्री.सदिप जी दोडे तसेच मुल नगर परिषद येथील कार्यालय अधीक्षक आसेकर, कार्यालय सहाय्यक उपधीक्षक येनुरकर यांनी सहकार्य केले यांचे पण आभार मानण्यात आले. यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले , यावेळी संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सुभाष महानदे, चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते शुभंम कुडाबोर, मुल तालुकाध्यक्ष ,सदिप पारचे व सफाई कामगारांचे ,वारसदार मोनिका मिलिंद मेश्राम , संदेश भगवान खोब्रागडे, सुरेश कवडू निमगडे, मिलिंद नंदकिशोर मेश्राम वारसदार व सफाई कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments